कार्यालयात लॅपटॉपवर काम करणारी स्क्रीन संलग्न करणारी स्त्री.

Microsoft ची गोपनीयता

आपला डेटा कार्यस्थानी, घरी आणि प्रवासात खाजगी आहे.

Microsoft मध्ये, आम्ही गोपनीयतेचे मूल्य राखतो, संरक्षण आणि समर्थन करतो. आमचा पारदर्शकतेवर विश्वास आहे, जेणेकरून लोक आणि संस्था त्यांचा डेटा नियंत्रित करू शकतात आणि त्याचा वापर कसा केला जातो याच्या सार्थ निवडी त्यांच्याकडे असतात. आमची उत्पादने आणि सेवा वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीयता निवडी आम्ही सक्षम आणि समर्थित करतो.

घरी

गोपनीयता ही ग्राहक दररोज वापरत असलेली उत्पादने आणि सेवा आम्ही कशा घडवतो याच्या केंद्रस्थानी आहे. आम्ही गोपनीयता संसाधने आणि नियंत्रणे प्रदान करतो, जेणेकरून आपण आपला डेटा आणि तो कसा वापरला जातो हे व्यवस्थापित करू शकता.

कार्यस्थानी

प्रतिष्ठान आणि व्यवसाय ग्राहक, IT प्रशासक किंवा कार्यस्थानी Microsoft उत्पादने वापरणारे कोणीही, आमची उत्पादने आणि सेवांमधल्या गोपनीयता आणि सुरक्षा पद्धतींविषयी माहिती मिळविण्यासाठी Microsoft विश्वसनीय केंद्राला भेट द्या.

गोपनियतेवर आमची वचनबद्धता

आम्ही सशक्त डेटा व्यवस्थापन पद्धतींमध्ये आमची गोपनीयता वचनबद्धता दृढ ठेवतो, जेणेकरून आम्ही आपल्या डेटाची गोपनीयता आणि गुप्तता संरक्षित करू आणि आपण प्रदान केलेल्या कारणांशी सुसंगत असलेल्या मार्गानेच ते वापरू.

आपण आपली माहिती नियंत्रित करा

आपला डेटा कसा वापरला जावा याबाबतच्या स्पष्ट आणि अर्थपूर्ण निवडींसह, आपला डेटा नियंत्रित करण्याची क्षमता आम्ही आपल्याला देतो.

आधुनिक कार्यालयात काम करत असलेल्या आत्मविश्वासू तरुण व्यावसायिकेेचे पोर्ट्रेट.
अंधूक कार्यालयात Microsoft Surface Studio वर स्क्रोल करत असलेल्या किंवा काम करत असलेल्या गडद शर्ट घातलेल्या स्त्रीचा साइड प्रोफाइल.

आपला डेटा संरक्षित आहे

आम्ही एनक्रिप्शन आणि इतर सुरक्षा उत्कृष्ट पद्धती वापरून आपला डेटा काटेकोरपणे संरक्षित करतो.

आपण डिझाइननुसार गोपनीयतेची अपेक्षा करू शकाल

प्रयोक्ता गोपनीयतेला उचलून धरण्यासाठीच्या मुलभूत वचनबद्धतेसह आम्ही आमची उत्पादने डिझाइन करतो.

आधुनिक कार्यालयात पार्श्वभूमीला त्याचे सहकारी असणाऱ्या डिजिटल टॅबलेट वापरणाऱ्या एका परिपक्व व्यावसायिकाचे पोर्ट्रेट.
स्त्री आणि पुरुष एंटरप्राइझ कर्मचारी स्टायलस पेन धरून मोकळ्या कार्यालयाच्या जागेत एकत्र काम करत आहेत.

आम्ही आपल्या अधिकारांंसाठी उभे राहू

आम्ही सशक्त गोपनीयता कायदे आणि संरक्षणासाठी लढतो आणि डेटासाठी शासन विनंती करण्यात आली तर आपल्या अधिकारांचे संरक्षण करू.

ही तत्त्वे गोपनीयतेवरील Microsoft दृष्टीकोनाचा पाया तयार करतात आणि आम्ही आमच्या उत्पादनांची आणि सेवांची बांधणी कश्याप्रकारे करतो यास आकार देणे सुरू ठेवतील.

आम्ही ती तत्त्वे सरावात कशी ठेवतो याविषयी अधिक माहिती मिळवा.

  • आमच्या गोपनीयता कार्याबद्दल आपल्याला अद्ययावत ठेवण्यासाठी आम्ही नियमितपणे Microsoft गोपनियता अहवाल प्रकाशित करतो.
  • ग्राहक वैयक्तिक डेटा कसा निर्यात किंवा हटवू शकतात हे आम्ही आमच्या गोपनियता FAQs मध्ये स्पष्ट करतो.
  • आम्ही Microsoft प्रायव्हसी स्टेटमेंट मध्ये आमच्या उत्पादनांविषयी आणि सेवांविषयी सखोल गोपनीयता माहिती देऊ करतो.
  • आम्ही तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा या ग्रहावरील प्रत्येकाला आणि प्रत्यक्ष ग्रहाला लाभ झाला पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. अधिक माहितीसाठी Microsoft कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी ला भेट द्या.

काय नवीन आहे

Microsoft कडील आपल्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याविषयीचे नवीनतम लेख, ब्लॉग पोस्ट्स आणि बातम्या घरी आणि कार्यस्थळी पहा. (काही सामुग्री केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध असू शकते.)

निर्णयकर्ते (DMs) आणि संघ हॉलवे मध्ये सहयोग करताना

Microsoft Priva सह कार्यस्थान गोपनियता सुधारा

Microsoft Priva हे एक नवीन गोपनीयता निरसन आहे ज्याची रचना संस्थांना गोपनीय-संवेदनक्षम कार्यस्थळे तयार करण्यात आणि माहिती कर्मचाऱ्यांना स्मार्ट डेटा-हाताळणी निर्णय घेण्यास सक्षम करण्यात मदत करण्यासाठी केली आहे.

आमच्या महामारी गोपनियता तत्त्वांचे पुनरावलोकन करा

डेटा संरक्षणाच्या महत्त्वाच्या नवीन टप्प्यासाठी Microsoft वचनबद्ध आहे

युरोपियन कमिशन आणि यु.एस. सरकारने अलीकडेच नवीन ट्रान्स-अटलांटिक डेटा गोपनीयता फ्रेमवर्कची घोषणा केली आहे, जो EU आणि यु.एस. दरम्यानच्या डेटा संरक्षण सेतूच्या पुनर्बांधणी आणि मजबूतीसाठी डिझाइन करण्यात आलेला करार आहे.या महत्त्वाच्या टप्प्याची Microsoft ने स्तुती केली आहे.

EU डेटा सीमा नकाशा

Microsoft Cloud साठी EU डेटा सीमा: एक प्रगती अहवाल

Microsoft क्लाउडसाठी EU डेटा सीमा तयार करण्याच्या आमच्या प्रवासामधील महत्त्वाचा टप्पा आणि ग्राहकांना आमच्या पद्धतींविषयी आणि EU डेटा सीमेच्या अंमलबजावणीच्या दिशेने केलेल्या प्रगतीविषयी मजबूत पारदर्शकता प्रदान करण्याच्या आमच्या चालू वचनबद्धतेविषयी वाचा.

डेटा इन्फ्रास्ट्रक्चर प्रतिमा

गोपनियतेवरील काही नवीन दृष्टीकोनांद्वारे आपले डेटा इन्फ्रास्ट्रक्चर संरक्षित करणे

नागरी समाज, व्यवसाय, शिक्षणतज्ञ आणि सरकार यांनी विचारला पाहिजे तो प्रश्न आपण डेटा वापरू शकतो का हा नव्हे तर त्याऐवजी एक चांगले जग निर्माण करण्यासाठी आणि मूलभूत मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही जबाबदार डेटा वापर कसा सक्षम करू शकतो हा आहे. आपण डेटाचा जबाबदार वापर आणि सामायिकरण यांस सक्षम करण्यास आवश्यक नवीन दृष्टीकोनांचा विकास कसा एक्सप्लोर करत आहोत याविषयी वाचा.

आपल्या गोपनीयता सेटिंग्ज व्यवस्थापनाविषयी जाणून घेण्यासाठी, Microsoft उत्पादनांमध्ये मला गोपनीयता सेटिंग्ज कुठे आढळू शकतील? पहा

आपण स्टेट ऑफ कॅलिफोर्नियाचे रहिवासी असल्यास कृपया आमचे कॅलिफोर्नियामधील ग्राहकांसाठी कॅलिफोर्निया कन्झ्युमर प्रायव्हसी अॅक्ट (CCPA) सूचना पहा.

आम्ही सुधारणा करण्यासाठी नेहमी कार्य करत आहोत, तेव्हा जर गोपनियतेच्याबाबतीत आमच्या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये आपल्याला असे काही आढळले जे आपल्या अपेक्षेनुसार कार्य करत नाहीत तर, कृपया आम्हाला सांगा.