Microsoft मध्ये गोपनीयता

आपल्याद्वारे नियंत्रित, आपले अनुभव समर्थित करणारा, आपला डेटा.

गोपनियतेवर आमची वचनबद्धता

Microsoft येथे, आमचे ध्येय या ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीस आणि प्रत्येक संस्थेस अधिकाधिक साध्य करण्यास सक्षम करणे आहे. याचा प्रारंभ आपण आमच्यासह डेटा सामायिक करता तेव्हा आपल्याला अर्थपूर्ण निवडी मिळतील याच्या खात्रीने होतो. याचा अर्थ असाही होतो की आम्ही पारदर्शक संप्रेषणासाठी वचनबद्ध आहोत—आम्ही आपल्या डेटासाठी का विचारतो आणि आपण सामायिक करता तो डेटा आम्ही कसा वापरतो याविषयी—आपल्या सर्व उत्पादनांवर आणि सेवांवर.

आम्ही आपला विश्वास रोज संपादन करण्यासाठी सहा मुख्य गोपनियता तत्त्वांवर लक्ष केंद्रित करून कार्य करत आहोत:

  • नियंत्रण: वापरण्यास सोपी अशी साधने आणि स्पष्ट निवडींसह आपल्या गोपनियतेचे नियंत्रण आम्ही आपल्या हातात देऊ.
  • पारदर्शकता: आम्ही डेटा संकलन आणि वापराच्या बाबतीत पारदर्शक राहू म्हणजे आपण माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकाल.
  • सुरक्षितता: आपण आमच्याकडे विश्वासाने दिलेला डेटा आम्ही सशक्त सुरक्षितता आणि एनक्रिप्शन द्वारे संरक्षित करू.
  • सशक्त कायदेशीर सुरक्षितता: आम्ही आपल्या स्थानिक गोपनियता कायद्यांचा आदर करू आणि मूलभूत मानवी हक्क म्हणून आपल्या गोपनियतेच्या कायदेशीर संरक्षणासाठी लढू.
  • सामुग्री-आधारित लक्ष्य न करणे: आपल्याप्रती जाहिराती लक्ष्य करण्यासाठी आम्ही आपले ईमेल, चॅट, फाइल्स किंवा इतर वैयक्तिक सामुग्री वापरणार नाही.
  • आपल्यासाठी फायदे: जेव्हा आम्ही डेटा संकलित करू, तेव्हा आम्ही तो आपल्या फायद्यासाठी आणि आपले अनुभव अधिक चांगले करण्यासाठी वापरू.

ही तत्त्वे गोपनीयतेवरील Microsoft दृष्टीकोनाचा पाया तयार करतात आणि आम्ही आमच्या उत्पादनांची आणि सेवांची बांधणी कश्याप्रकारे करतो यास आकार देणे सुरू ठेवतील.

हे पृष्ठ गोपनियता माहिती आणि नियंत्रणांवरील लिंक्स प्रदान करते जेणेकरून आपण आपल्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकता.

  • याव्यतिरिक्त, आम्ही आपल्याला आमच्या गोपनियता कार्याविषयी अद्ययावत ठेवण्यासाठी Microsoft गोपनियता अहवाल प्रकाशित करतो.
  • आम्ही वैयक्तिक डेटा कसा निर्यात करायचा किंवा हटवायचा हे देखील स्पष्ट करतो—आणि इतर डेटा विषयक अधिकार माहिती प्रदान करतो—आमच्या गोपनियता FAQs मध्ये.
  • आम्ही सुधारणा करण्यासाठी नेहमी कार्य करत आहोत, तेव्हा जर आमच्या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये गोपनियतेबाबत आपल्याला असे काही आढळले जे आपल्या अपेक्षेनुसार कार्य करत नाहीत तर, कृपया आम्हाला सांगा.
  • आमच्या उत्पादनांविषयी आणि सेवांविषयी अधिक खोलवर गोपनियता माहिती शोधण्यासाठी Microsoft प्रायव्हसी स्टेटमेंट पहा.

प्रतिष्ठान आणि व्यवसायिक ग्राहकांसाठी

प्रतिष्ठान आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी, IT प्रशासक किंवा कार्यावर Microsoft उत्पादने वापरणाऱ्या कोणाहीसाठी गोपनियता आणि सुरक्षा आमच्या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये याविषयी माहिती मिळवण्यासाठीMicrosoft विश्वसनीयता केंद्रपहा


आपण Microsoft वर योगदान देण्यासाठी कोणत्याप्रकारचे डेटा निवडू शकता?

Microsoft आपल्याला वैयक्तिकृत अनुभव प्रदान करण्यासाठी आणि आपल्याला सुरक्षित ठेवण्यास मदत करण्यासाठी आमची उत्पादने आणि सेवा सुधारित करण्यासाठी आणि ते सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी आपल्यासमान लोकांनी योगदान दिलेल्या ग्राहक डेटाचा वापर करते. येथे आम्ही संकलित करतो त्या डेटापैकी काही सर्वात सामान्य श्रेण्या आहेत:

वेब ब्राउझिंग आणि ऑनलाइन शोध

वेब ब्राउझ करणारी आणि शोध घेणारी महिला

वेब ब्राउझिंगला गती देण्यासाठी, आपण कोठे जाऊ इच्छिता याचे पूर्वानुमान करण्यासाठी आम्ही ब्राउझिंग इतिहास संकलित करतो आणि वापरतो. अधिक जाणण्यासाठी, ब्राउझिंग डेटा आणि गोपनियता पहा.

Microsoft Edge विषयी प्रायव्हसी स्टेटमेंटमध्ये वाचा >

अनेक शोध इंजिनप्रमाणेच, आम्ही आपल्याला उत्कृष्ट शोध परिणाम देण्यासाठी, आपला Bing शोध इतिहास आणि इतर लोकांकडून एकत्रित केलेला इतिहास वापरतो.

Bing शोध विषयी प्रायव्हसी स्टेटमेंटमध्ये वाचा >

आपल्या Microsoft खात्यासह संबंधित असलेला शोध इतिहास किंवा ब्राउझिंग इतिहास पाहण्यासाठी आणि हटवण्यासाठी, गोपनियता डॅशबोर्डवर भेट द्या.

आपण जाता ती स्थाने

आईस्क्रिम स्‍टोअरची कार ड्राइव्‍ह करत आहे

स्थान माहिती आपण जाऊ इच्छिता त्या ठिकाणांचे दिशानिर्देश आपल्याला देण्यात आम्हाला मदत करते आणि आपण जिथेही असता तेथील संबद्ध माहिती आपल्याला दर्शविते. यासाठी, आम्ही आपण प्रदान करता ती स्थाने किंवा GPS किंवा IP पत्ते यासारखे तंत्रज्ञान वापरून आम्हाला आढळलेली माहिती वापरतो.

स्थान शोधण्यामुळे आपल्याला संरक्षित करण्यात देखील आम्हाला मदत होते. उदाहरणार्थ, आपण जवळपास टोकियोमध्ये नेहमीच साइन इन करत असल्यास आणि एकाएकी आपण लंडनमधून साइन इन केल्यास, आपण खरोखर तेच असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही ते तपासू शकतो.

आपण आपल्या डिव्हाइससाठी स्थान सेवा चालू किंवा बंद करू शकता, आपल्या स्थानावर कोणत्या अनुप्रयोगांना ऍक्सेस असावा ते निवडू शकता आणि आपल्या डिव्हाइसवर संग्रहित केलेला स्थान डेटा व्यवस्थापित करू शकता. अधिक जाणून घेण्यासाठी, Windows 10 स्थान सेवा आणि आपली गोपनियता पहा.

प्रायव्हसी स्टेटमेंटमध्ये स्थानाविषयी वाचा >

आपल्या Microsoft खात्यासह संबंधित असलेले स्थान कार्यकलाप पाहण्यासाठी आणि हटवण्यासाठी, गोपनियता डॅशबोर्डवर भेट द्या.

आपल्याला सहाय्य करण्यास आम्हाला मदत करणारा डेटा

पदपथावर फोनकडे बघणारा माणुस

आपण आपली दिनदर्शिका व्यवस्थापित करण्यात मदत करण्यास, आपले शेड्युल अद्ययावत ठेवण्यास, भेटींमध्ये सामील होण्यास, तथ्ये आणि फाइल्स शोधण्यास आणि केवळ गोष्टी सोप्या करण्यास Cortana वापरू शकता. आपल्याला वैयक्तिकृत अनुभव प्रदान करण्यासाठी, Cortana आपल्याविषयीच्या काही डेटावरून शिकते, जसेकी आपले शोध, दिनदर्शिका, संपर्क आणि स्थान यांवरील माहिती. आपला डेटा कसा व्यवस्थापित करायचा याच्या समावेशासह अधिक जाणून घेण्यासाठी Cortana आणि आपली गोपनियता पहा.

प्रायव्हसी स्टेटमेंटमध्ये Cortana विषयी वाचा >

अधिक स्वारस्यपूर्ण जाहिराती दर्शविण्यासाठी आम्ही वापरतो तो डेटा

रस्त्यावरून चालणारी महिला

काही Microsoft सेवा जाहिरातींद्वारे समर्थित केल्या जातात. आपल्याला अधिक स्वारस्य असलेल्या जाहिराती दर्शविण्यासाठी, आम्ही आपले स्थान, Bing वेब शोध, Microsoft किंवा आपण पाहता ती जाहिरातदार वेब पृष्ठे, जनसांख्यिकी आणि आपण पसंत केलेल्या गोष्टी यासारखा डेटा वापरतो. आम्ही आपण ईमेल, चॅट, व्हिडिओ कॉल्स, किंवा व्हॉइस मेलमध्ये किंवा आपल्या दस्तऐवजांमध्ये किंवा इतर वैयक्तिक फाइल्समध्ये काय बोलता याचा वापर करून आपल्यासाठीच्या जाहिराती लक्ष्यित करत नाही.

आपल्या स्वारस्यांवर आधारित जाहिराती आपल्याला दर्शविण्यापासून Microsoft ला थांबविण्यासाठी, आपण आपल्या जाहिरात सेटिंग्ज बदलू शकता. आपल्याला तरीही जाहिराती दिसतील, परंतु त्या आपल्यासाठी तितक्या स्वारस्याच्या नसू शकतात.

प्रायव्हसी स्टेटमेंटमध्ये जाहिरातीविषयी वाचा>

आपल्या जाहिरात सेटिंग्ज बदलण्यासाठी, गोपनियता डॅशबोर्डवर भेट द्या.

आपण Microsoft कडून प्रचारात्मक इमेल्स आणि वृत्तपत्रे प्राप्त करू इच्छिता की नाही ते निवडण्यासाठी, आपल्या संप्रेषण सेटिंग्ज बदला.

साइन-इन आणि देय डेटा

कॉफीसाठी माणूस देय देत आहे

आपण Microsoft खात्यासह सहयोग करण्यास निवडल्यास आम्ही आपली Microsoft खाते साइन माहिती आणि आपली देय साधन माहिती संग्रहित करतो. आम्ही आपल्यासाठी साइन इन करण्यास आणि अनुप्रयोग, गेम्स किंवा मीडिया यांसाठी देय देण्यास सोपे व्हावे म्हणून असे करतो.

पासवर्ड्स, सुरक्षा-माहिती आणि देय पर्याय अद्ययावत करण्यासाठी आपले खाते कसे सुरक्षित ठेवायचे यावर माहिती शोधा आणि आपले अलीकडील साइन--इन कार्यकलाप पाहण्यासाठी Microsoft खाते वेब साइट वर भेट द्या.

Microsoft खात्यांविषयी प्रायव्हसी स्टेटमेंटमध्ये वाचा >


Microsoft उत्पादने आणि आपली गोपनियता

आपण आमच्या उत्पादनांमधील आणि सेवांमधील गोपनियता पृष्ठ वर Microsoft उत्पादनांसाठी आपल्या गोपनीयता सेटिंग्ज व्यवस्थापित करण्याविषयी जाणून घेऊ शकता आणि समर्थक सामुग्रीवरील लिंक्स शोधू शकता

आपण स्टेट ऑफ कॅलिफोर्नियाचे रहिवासी असल्यास कृपया आमचे कॅलिफोर्नियामधील ग्राहकांसाठी कॅलिफोर्निया कन्झ्युमर प्रायव्हसी अॅक्ट (CCPA) सूचना पहा.